Share

राज्याची एक इंच जमीन कोणालाही देणार नाही, येडियुराप्पा गरजले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी भाष्य केले आहे. कोणत्याही कारणास्तव राज्याची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर काहीजण आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठीच असल्या कुरापती काढत आहेत, असेही ते म्हणाले.

बंगळूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत. ते म्हणाले की, कन्नडिगांचे हित जोपासण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. याबाबत कुणीही गोंधळ करून घेऊ नये. महाजन अहवालानुसार कर्नाटकाचा भाग ज्या ठिकाणी समाविष्ट व्हावयाचा होता तो झाला आहे. महाराष्ट्रालाही न्याय मिळाला आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांकडून केलेल्या विधानांचा निषेध असून तो केवळ राजकीयप्रेरित आहे. त्यास जास्त महत्त्व देणे गरजेचे नसल्याचेही येडियुराप्पा म्हणाले. ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, कर्नाटकात कन्नड आणि मराठी लोक सौहार्दतेने राहत आहेत. सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषीत अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे ते म्हणाले होते. यावरून : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!