Share

Sanjay Raut | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी स्क्रिप्टेड ; संजय राऊत यांचा भाजपवर आरोप

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या (Maharashtra-Karnataka border dispute) मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. हा नव्याने निर्माण झालेला वाद स्क्रिप्टेड असल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या मनातील संतापावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला आहे. याच्यामागे फार मोठ कारस्थान आणि षडयंत्र आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे या सरकार विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरचे लक्ष विचलित व्हावे, शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा. म्हणून बोम्मईंना पुढे करुन महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे.”

संजय राऊत म्हणाले की, भाजप हा शिस्तीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री दुसर्‍या भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध आक्रमक झाल्याचे यापूर्वी कोणी पाहिले आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कधी काही बोलल्याचे कोणी पाहिले आहे का? पण आज कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!