टीम महाराष्ट्र देशा : आपल्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे कारलं. आपल्या जेवणात जर कारले असेल तर ते आपण हळूच ताटामधून बाजूला काढतो. पण हे जरी खर असलं तरी अजून एक गोष्ट नक्की खरी आहे. कारण कारलं आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.
याच प्रमाणे डायबेटीस असलेल्या लोकांना कारल्याचा रस प्या असे हमखास सांगितले जाते. कारल्याचा हा त्वचेसाठी देखील अतिशय उपयुक्त असते. या व्यतिरिक्त कारल्याचे काय काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊ या.
कारलं जरी चवीने कडू असले तरी ते आपल्या शरीरासाठी खूप उपुयक्त आहे. कारल्याची भाजी चविष्ट, रुचकर आणि शरीरासाठी खूप गुणकारी आहे. कारल्यात मोठ्या प्रमाणात खनिजे, जीवनसत्वे आहे. कारलं रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगावर कारलं उत्तम पर्याय आहे.
तसेच जर त्वचेवर खाज किंवा कोणताही त्वचा विकार झाला असेल तर एक कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून हा रस हळू हळू प्यावा चार ते सहा महिने हा प्रयोग केल्याने कितीही जुनाट त्वचा रोग असले तरी तो बरा होतो. कारल्याच्या रसाने त्वचेवर मालिश केल्याने देखील फायदा होतो. मधुमेहासाठी कारलं उत्तम औषध ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
तुमच्या सर्वांची ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करा : जयंत पाटील
राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार : फडणवीस


