मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु झालं आहे. अनेक कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे.
या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी या सर्वांविरोधाततक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात करण जोहरला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे, अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती.मात्र या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली.
आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे. करण जोहर त्याच्या सिनेमात केवळ स्टार किडसना संधी देतो. प्रतिभावान कलाकरांच्या पदरी नेहमीच निराशा पडते अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्री स्वरा भास्कर ही करण जोहर आणि आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.स्वराने आपल्या ट्विटरमध्ये लिहिले की,’भारताच्या काही भागांत ट्विटरवर करण जोहर आणि आलिया भट्ट यांना सुशांतच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवित आहे, ते ही एका चॅट शोमध्ये खेळले गेलेल्या एका खेळामुळे (हे त्या लोकांसाठी ज्यांनी बॉलीवूडच्या नेपोटिझमचा गैरवापर करीत आहेत).
Parts of India Twitter blaming #KaranJohar and #AliaBhatt for the tragic suicide of Sushant – for some silly game played on a frivolous and pointless chat show (that All those people who are now abusing Bollywood nepotism lapped up) is both the height of idiocy and hypocrisy! 1/n
— Swara Bhasker (@ReallySwara) June 15, 2020
Sushant didn’t leave a note. We don’t know what he went thru. We don’t know the cause. STOP taking out ur frustration using the pain of a troubled person. He didn’t leave a note! Get it? He didn’t want to talk about it. He’s gone. Let him have his peace & his family privacy. 2/n
— Swara Bhasker (@ReallySwara) June 15, 2020
तिने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, सुशांतने कोणतीही नोट सोडली नाही. आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की त्याच्यासोबत नेमके काय झाले. त्यामुळे एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या दुःखाचा उपयोग करत निराकरण करणे थांबविले पाहिजे. त्याने एक नोट सोडली नाही! त्याला याबद्दल बोलण्याची इच्छा नव्हती. तो आता गेला आहे. त्याला शांती आणि त्याच्या कुटुंबयीांना सुरक्षितता द्या, असे तिने म्हटले आहे.
मुख्यमंत्री पंतप्रधानांना म्हणाले आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या !
कोरोनाकाळातील विजबिले कमी करण्याची भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

