Share

कंगना रनौतने केलं विराट कोहलीचे कौतुक, म्हणाली….

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कंगना रनौतचा ‘पंगा’ चित्रपट आज (२४ जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. ती या चित्रपटात कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. एकंदरीत चित्रपटाची स्टोरी क्रीडेशी संबंधित असल्यामुळे आपल्या फिल्मचे प्रमोशन करण्यासाठी कंगना क्रिकेट प्रसारण वाहिनीवर गेली होती. यावेळी तिने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले.

“विराट कोहली हा ‘पंगा किंग’ आहे. तो फार धाडसी आहे आणि प्रत्येक आव्हानांसाठी तयार असतो. पंगा आणि भारत- न्यूझीलंडचा सामनाही एकाच दिवशी आहे.” असे म्हणत कंगनाने क्रिकेटपटू कोहलीची प्रशंसा केली.’त्याचबरोबर मी आणि विराट एकाच दिवशी पंगा घेतोय. मी चित्रपटगृहात तर तो मैदानात.’ असेही ती यावेळी म्हणाली.

सिनेव्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी पंगाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज वर्तवला आहे. “हा चित्रपट लग्न झालेल्या महिलेची करियरसाठीची धडपड यावर आधारित आहे. म्हणून 30 ते ३५ वयोगटातील मंडळी हा चित्रपट आवर्जून पाहतील. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाची ५ कोटीची कमाई होऊ शकते.असे जोहर यांनी सांगितले.

अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त पंजाबी इंडस्ट्रीतील गायक आणि अभिनेता जस्सी गिलदेखील अभिनय करताना दिसतील. कंगनाच्या पतीची भूमिका ते साकारत आहेत. यांव्यतिरिक्त अभिनेत्री ऋचा चड्डा आणि नीना गुप्ता यांचादेखील चित्रपटात समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!