🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट रिलीज येत्या 10 सप्टेंबर रोजी म्हणजे कालच थिएटरमध्ये रिलीज झाला. प्रेक्षकांच्या देखील हा चित्रपट पसंतीस पडत आहे. मात्र असे असताना देखील कंगनाच्या अडचणीत वाढ होणारी माहिती समोर आली आहे.
‘थलाईवी’ रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. अनेकजण या चित्रपटाची अतुरतेने वाट पाहता होते. मात्र चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने त्याचा परिणाम होऊ शकण्याची दाट शक्यता आहे. हा चित्रपट तमिळ रॉकर्सने लीक केली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. हा सिनेमा ऑनलाईन मोफत डाऊनलोड केले जात आहे. चित्रपटाच्या डाउनलोड लिंक अनेक चॅटिंग अॅप्सवर शेअर केल्या जात आहेत त्यामुळे याचा फटका कंगना आणि चित्रपट निर्मात्यांना बसण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/CToMiBzodt4/?utm_source=ig_web_copy_link
हा चित्रपट जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसचे संकट असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचाही तारीख पुढे ढकलली गेली. मात्र अखेर काल हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

