Share

काँग्रेसच्या काळात गरीबीमुळे देशाची दुर्दशा झाली : कंगना राणावत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईसह महाराष्ट्रातील १७ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं सध्या मतदान सुरू आहे. बॉलिवूडमधील सर्व तारे-तारका मतदानाचा हक्क बजावताना दिसत असून अनेक सेलिब्रेटी मंडळींनी सकाळीच मतदान केंद्र गाठत मतदानाचा आपला अधिकार बजावला.

प्रियंका चोपडा, कंगना राणावत, आमिर खान, आर माधवन, संजय दत्त, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, जया बच्चन, परेश रावल, रवी किशन, हृतिक रोशन, अरबाज खान, सोहेल खान यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केल्यानंतर कंगनाने काँग्रेसवर सडकून टीका केली. ती म्हणाली, आपला देश याआधीही गुलामगिरीतच होता. आपले नेते लंडनमध्ये आराम करत राहायचे. काँग्रेसच्या काळात गरीबी, प्रदूषणामुळे देशाची दुर्दशा झाली. यापेक्षा वाईट अवस्था होऊ शकत नाही असं म्हणत कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. तर आता आपल्या स्वराज्य आणि स्वधर्माची वेळ आली आहे. आपल्याला मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करायला हवे असं म्हणत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित देखील केले .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!