🕒 1 min read
मुंबई : कंगना राणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध कॉमेडी शो असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहचली होती. तिने शोमध्ये खूप धमाल केली. याचबरोबर कंगनाने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची ही खिल्ली उडवली.
कंगना राणौत तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टिव्हीवर प्रसिद्ध असलेल्या द कपिल शर्मा शोच्या मंचावर पोहचली होती. यादरम्यान कंगना बॉलिवूड स्टार कीड अनन्या पांडेची खिल्ली उडवताना दिसली. शो मधील कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये कंगना अनन्याची नक्कल करताना दिसत आहे.
Kangana ???? pic.twitter.com/5sxElOkj5G
— ???? (@hourlyfiona) May 15, 2022
कपिल शर्मा शो च्या स्टेजवर अनन्या ने केलेला अभिनय कंगना करताना दिसत आहे. या व्हिडिओत कपिल कंगनाला विचारतो, ‘बोली बिंबो’ म्हणजे काय? यावर अभिनेत्री कंगना नाकाला जिभेने स्पर्श करताना दिसत आहे. यानंतर ती खूप मजेदार पद्धतीने म्हणते, ‘मी माझ्या नाकाला माझ्या जिभेने स्पर्श करू शकते.’
कंगणाचे हे कृत्य पाहून कपिल शर्मालाही हसू आवरले नाही. यानंतर, अनन्याची क्लिप व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये कंगनाने देखील तिच्या नाकाला जिभेने स्पर्श करताना दिसत आहे आणि कंगना म्हणते, ही माझी प्रतिभा आहे. व्हिडीओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
