मुंबई: देशाची अर्थव्यवस्था पुर्णतः ढासळलेली असून अशा वेळेस जनतेचे लक्ष हटवण्यासाठी कंगणा रणौतला पुढं आणलं जात आहे असा घणाघात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केला आहे. राज्यात कंगणा रणौत आणि शिवसेनेतील वाद विकोपाला पोहचला आहे. काल मुंबई महापालिकेने कंगणा रणौतचे कार्यालय पाडले आहे. अशातच आता यावर खा.डॉ. कोल्हे यांनी भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे. हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या वक्तव्यावरूनच ते दिसून येत आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
एखाद्या वक्तिला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. कलाकारांनीही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करताना सामाजिक भान जपलं पाहिजे, असं सांगतानाच देशात रोज हजारो केसेस सापडत आहेत. त्याचंही सर्वांनी भान राखलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
कोल्हे यांनी कंगनाप्रकरणावरून अप्रत्यक्षपणे भाजपवर टीकास्त्र सोडलेलं असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनाने मुंबईबाबत जे वक्तव्य केलं त्यावर मी सहमत नाही. पण शिवसेनेने कामधंदा सोडून तिच्याविरोधात मोहीम उघडली आहे.
शिवसेनेची ही कृती चुकीची आहे. कंगनाच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची गरज नव्हती. केवळ सूड भावनेतूनच शिवसेनेने ही कारवाई केली आहे. शिवसेनेची पालिकेत सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेने ही कारवाई केली, असं सांगतानाच कोर्टाने या तोडकामाला स्थगिती देत ही कारवाई चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना एका महिलेला सूड भावनेतून त्रास देत असल्याचं उघड झालं आहे, असा दावा निरुपम यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बाळासाहेबांचे चिरंजिव एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगणाला भोवणार, विक्रोळीत गुन्हा दाखल
शिवसेना अन भाजपचे फाटलेले, पण मोदींच्या ‘या’ योजनेसाठी सेनेच्या खासदारांचे प्रयत्न

