Share

‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएलसंबंधित महत्वाचा निर्णय हा बीसीसीआयकडून 14 मार्च म्हणजे शनिवारी घेण्यात येणार असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाने क्रिकेटर्सना देखील आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आहे. रिचर्डसन न्यूझीलंड विरूद्ध सामन्यात आता खेळू शकणार नाही. रिसर्डसन यावर्षी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजेस ऑफ बंगलुरूमधून खेळत आहे.

हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. हे दोघेही काही कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणं दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

100 हून अधिक देशांना कोरोना व्हायरसचा फटका बसल्यानंतर जगभरत भीतीचे वातावरण आहे. हँक्स आणि रिटा दोघेही 63 वर्षांचे आहेत. क्वीन्सलँडमध्ये सर्दीची लक्षणं दिसून आल्यावर वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केल्याचे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. आता ते काही काळ सर्वांपासून दूर राहून उपचार घेतील.

दरम्यान, भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे. आत्तापर्यंत 75 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!