Share

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ दिवशी कल्याणराव काळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर – पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

दरम्यान,या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

कल्याणराव काळे यांना पंढरपूर आणि माढ्यामध्ये मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. साखर कारखाना तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर भागातील ४३ गावांमध्ये काळे यांचा प्रभाव आहे. पंचक्रोषित काळे यांचा चांगलाच दबदबा असल्याने या निवडणुकीत भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!