Share

सोशल मीडियावर द्वेष पेरला तो उगवला, समाजातील राग बघून मोदी पळाले – जितेंद्र आव्हाड

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण येत्या रविवारपासून समाज माध्यम अर्थात सोशल मिडिया वरून आपले सर्व अकाऊंट वापरणं सोडून देण्याबद्दल विचार करत असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ‘सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का?,” असा सवाल यांनी केला आहे.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ‘समाजातील राग बघून मोदी पळाले, सोशल मिडीयावर द्वेष पेरला तो उगवला, म्हणूनच त्यांनी सोशल मिडियाचा त्याग करण्याचे संकेत दिले होते, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात सोशल मिडियाचा मोठा वाट आहे असा सर्वच विश्लेषकांनी मान्य केलं आहे. परंतु आता नरेंद्र मोदी हेच मध्यम सोडणार अशी माहिती त्यांनी स्वताच जाहीर केल्याने अनेक चर्चांना उधान आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!