मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतानाचं आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन केल आहे.
याबाबतच्या वृत्ताला खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे. मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही ‘होम क्वारंटाइन’चा निर्णय घेतला आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकार देखील आले होते. त्यामुळे त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान पोलीस, आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकार हे सेवेसाठी कोरोनाच्या संकटातही कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि काही पोलिसांना देखील आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठीच प्रशासन वारंवार नागरिकांना घरी सुरक्षित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
