Share

मा.गो.वैद्य महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही – जितेंद्र आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : “राज्याची पूनर्रचना होणं आवश्यक आहे. यानंतर विदर्भ वेगळा होईल. कोणत्याही राज्याची लोकसंख्या तीन कोटींच्या वर आणि एक कोटीच्या खाली नको, असं यापूर्वी अनेकांनी सांगितलं आहे. यामुळेच गोवा महाराष्ट्रापासून वेगळं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्राचे तीन किंवा चार भाग होतील. छोट्या राज्यांसाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमला पाहिजे”, अस वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्यावर आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.

यावर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वैद्य यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. “मा.गो.वैद्य कृपया महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका. महाराष्ट्राचे सामाजिक लचके तुम्ही जन्मापासूनच तोडता आला आहात. आता महाराष्ट्राचे भौगोलिक लचके तोडण्याची भाषा तुम्ही करू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्र एक होता एक राहील” अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वैद्य यांना फैलावर घेतल आहे.

दरम्यान, “जर मनसेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. जर त्यांना भाजपाची भूमिका स्वीकृत असेल आणि संघाची व्यापक हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल,” असं देखील वैद्य म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!