Share

माझे वर्षभराचे सर्व आर्थिक लाभ सरकारी तिजोरीत जमा करून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखता यावा यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे राज्यसरकारच्या उत्पन्नावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कर्मचारी तसेच आमदारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षभराचा माझा, माझ्या ड्रायव्हरचा अन् पी. ए. चा पगार कापा अन् सरकारी तिजोरीत जमा करा, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. हा निधी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि गोर गरीब जनतेसाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली.

ते म्हणाले,’मी आज काहीतरी ऐकलंय की महाराष्ट्रातील आमदारांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे. मी माझ्या वतीने आज जाहीर करतो की ह्या वर्षीचा संपूर्ण पगार मला शासनाने देऊ नये. तो गोरगरीब तसंच महाराष्ट्रातील गरजवंतांच्या कल्याणायासाठी वापरावा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून जे काही आर्थिक सहकार्य मिळते म्हणजे ड्रायव्हरचा पगार तसंच माझ्या पी. ए. चा पगार असा कोणताच पगार आम्हाला नको. आमचा पगार सरकारी तिजोरीत जमा करावा. माझ्या वतीने मी छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!