Share

‘बेबी पेंग्विन गोइंग डाऊन’ ; नितेश राणेंचा खोचक निशाणा

Published On: 

मुंबई : कालचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिले.

कंगना रणौतच्या अनधिकृत बांधकामावर काल करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला. तर, कंगनाच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने देखील या तोडकामास स्थगिती दिली. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी टोकाला गेलेले दिसून आले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या पार्श्वभूमीवर ट्विट करत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये एक इंग्रजी कविता लिहिली आहे. ” Roses r red, Violtes r blue..Baby Penguin is going down, Kitna bhi todle tu” असे ट्विट करत कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला असला तरी तुम्ही खालीच जात राहणार असा टोला लगावला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे असून अनधिकृत झोपडपट्टयांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा वरदहस्त आहे का? कंगनाने गेल्या काही दिवसात मुंबई पोलीस व व्यवस्थेबाबत आवाज उठवल्यानंतरच ही नोटीस काढल्याने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

निवडणुकीच्या फायद्यासाठी सुशांतला ‘ बिहारी अभिनेता’ केलं , काँग्रेसचा आरोप

कॅगच्या अहवालाने ‘दूध का दूध पाणी का पाणी केले’ ; जलयुक्त शिवारावरून शिवसेनेची टीका

राफेलची हवाई दलात अधिकृतपणे ‘एण्ट्री’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!