टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करून तरुणांची माथी भडकावतात आणि त्यांना वाममार्गाला घेऊन जातात. त्यांच्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आव्हाड प्रसार माध्यमांशी बोलत होते.
श्रीसंत भिडे महाराज यांनी परत मुक्ता पळवली. साहित्य, कवी आणि संतसाहित्य लिहिणारे हे सर्व केराच्या टोपलीच्या लायकीचे आहेत असे भिडे गुरुजी यांनी म्हंटले होते, इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी मनु समोर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज छोटे आहेत, संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांचे साहित्य केराच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे असल्याचे म्हणण्यापर्यंत भिडे गुरुजींची मजल गेली आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
इतकेच नव्हे तर ज्या धर्मानी अहिंसा, इतर धर्मांचा सन्मान, वासुदेव कुटुंबकम शिकवलं त्या धर्माला हिंसेकडे नेण्याचे काम ते करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला.
याचबरोबर संभाजी भिडे नेहमी म्हणतात या सर्व गोष्टींना गोहत्या जबाबदार आहे, पाऊस पडत नाही याला गोहत्या जबाबदार आहे, तसेच गरिबी, दुष्काळ या सर्व गोष्टींनाही गोहत्या जबाबदार आहे. त्यांनी गोहत्या होतात तरी कुठे हे दाखवावे, असेही आव्हाड यांनी म्हंटले. तसेच संभाजी भिडे निष्कारण तरुणांची माथी भडकवतात, त्यांना वाममार्गांना नेण्याचे काम ते करत आहेत. संभाजी भिडेंमुळे महाराष्ट्र धोक्यात आहे, असेही आव्हाड यांनी म्हंटले.
संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य करून तरुणांची माथी भडकावतात आणि त्यांना वाममार्गाला घेऊन जातात. त्यांच्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आहे.
–@AwhadSpeaks pic.twitter.com/Jy55RTkBjW— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 27, 2019


