टीम महाराष्ट्र देशा : राजकीय नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवल्याप्रकरणी सरकारनं विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी आणि या सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ,फेसबुकनं ४० लोकांची नावं उघड केली आहेत, त्यामध्ये १४ लोक महाराष्ट्रातले आहेत. ही मर्यादीत यादी आहे. यापेक्षा जास्त माहिती असू शकते. याची माहिती केंद्रसरकारला मे महिन्यापासून होती. केंद्र सरकारला नावं कळली आहेत तर ती जाहीर करावीत, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘एग्रीकल्चर स्ट्राइक’ करत राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची किंवा रांगेत उभे रहाण्याची गरज नसणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी या घोषणेनंतर स्पष्ट केलं आहे.
कर्जमाफीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात येत आहे. मात्र या कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही फॉर्म भरायची किंवा रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.तसेच या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले असल्याचे सुद्धा जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1208659431786860544?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1208659032937918465?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

