Share

जयंत पाटलांच्या ‘झिंगाट’ला मुनगंटीवारांचे जशाच तसे उत्तर 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट गाण्याच्या तालावर राज्य सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील झिंग झिंग झिंगाट गाण्याचा आधार घेत जशास तसे उत्तर दिले आहे. तसेच  विरोधकांवर टीका करत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

सुधीर मुनगंटीवार यांचे झिंगाट उत्तर…

उरात होतीय धडधड, ज्यांची सत्ता क्षणात गेली,
जनतेच्या रागाची झाली बाधा, घड्याळ हातात फुटून गेली,
समदं झ्याक झालंया, कमळ-धनुष्य बाण फुलून आलंया,
आरं राहुलच्या खेम्यातं, राष्ट्रवादीच्या कोमातं.. राज ही रडतोया,
झालंय झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंगाट…

चल विकास करुया, साथ मोदींची आहे,
थकलेले विरोधक कसं टुकुर टुकुर पाहे,
त्याला थकत राहू दे, की बघत राहू दे,
प्रगतीचं हे प्रेम ही आहे बुलेट ट्रेन,
आता बुंगाट जाऊदे, जाऊदे.. झिंग झिंग झिंगाट

समद्या राज्याला झालीया, आमच्या विजयाची घाई,
शिवधनुष्य सोबत येणार ही शिवशाही,
छत्रपतीच्या नावानं आणि आदरभावानं
चालवू हे शासन, उत्तम प्रशासनं, जनतेला देऊनी
गाऊया, झिंग झिंग झिंगाट… झिंग झिंग झिंगाट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!