सांगली दि. १७ जुलै – गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यासाठी प्रशासन सर्व ती खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी… गर्दीत जाऊ नका… गर्दी करू नका… सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा… असे आवाहन सांगली जिल्हयाचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
सांगलीतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ८०० चा आकडा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगलीकरांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
आपल्याला कोरोना होणारच नाही असं डोक्यात ठेवून काही जण गर्दी करत आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढत आहे. आपल्या जिवाला जपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे सहकार्य अपेक्षित आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्यामुळे कारखाने बंद होतील… रोजगार जाईल, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अडचण होईल, आर्थिक फटका बसेल त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या असेही कळकळीची विनंती जयंत पाटील यांनी सांगलीकरांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अमिताभ बच्चन यांचा कवितेतून डॉक्टरांना सलाम; म्हणाले…
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये – गुलाबराव पाटील
‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – अजित पवार
‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

