🕒 1 min read
मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण गरम झालेलं दिसून येतं आहे. त्यात अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीचंही वारं घुमू लागलं आहे. या पोटनिवडणूकीसाठी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना निवडणूक आयोगाने वेगवेगळी नावं आणि चिन्हही दिले आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्षामध्ये दरी निर्माण होण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रस पक्ष जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना पक्ष फूटण्यामागचं कारण सांगितलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील ?
शिवसेना पक्षात झालेली बंडखोरी ही शिवसेनेची अंतर्गत बंडखोरी कधीच नव्हती, ही भाजपा पुरस्कृत बंडाळी होती, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टी फार काळ सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पडेल ती किंमत मोजून शिवसेना फोडली. आता महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेली आहे. शिवसेनेचा जो फुटीर गट आहे, त्याचाही महाराष्ट्रात पदोपदी निषेध व्यक्त केला जात आहे. आता बंडखोरीचं खापर फोडण्यासाठी कुणीतरी हवं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला जातोय, असं पाटील यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीला पुढाकार घेऊन साथ दिली. शरद पवार यांनीच महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनेच त्याच्याविरोधात कटकारस्थान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे काही झालं तरी राजकारणात प्रोफेशनली टिकायचं असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे, हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली. शिवसेना संपूर्ण संपवण्याचं कारस्थान रचलं. आता त्यांचं चिन्ह आणि नावही काढून घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे. आता ती कोणाच्या घरात सापडेल? हे थोड्याच दिवसात कळेल. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे सगळं एकनाथ शिंदेंकडे देण्याची व्यवस्था केली जाईल, याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नसल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे.
पुढे जयंत पाटील असंही म्हणाले, हिंदुत्वाची मतं फुटली तर आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजप ग्रासली आहे. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. यामागे दुसरं कोणतंही कारण नाही. शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपाप्रणितच होती. बंडखोरीच्या काळात एकनाथ शिंदे सतत देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते, हे एकनाथ शिंदे यांनीच कबुल केलं आहे. याचा अर्थ जाहीरपणे हाच आहे की, शिवसेना फोडण्याचं काम भाजपानं केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचं कारस्थान भाजपानं केलं आहे
महत्वाच्या बातम्या :
- “शिंदे गट निमित्त! भाजपने शिवसेना फोडली, देवेंद्र फडणवीसांनी बेत अमलात आणला”
- Shital Mhatre | भविष्यात आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल – शीतल म्हात्रे
- Mulayam Singh Yadav | मुलायम सिंग यादवांना निरोप देताना धर्मेंद्र यादवांचे हुंदके, पाहा व्हिडीओ
- Kishori Pednekar | शिंदे-फडणवीसांच्या ट्रीगर पॉईंटवर आयुक्त चहल ; किशोरी पडणेकर यांचा आरोप
- Anil Parab । “ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाचं अमिष”; अनिल परब यांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
