🕒 1 min read
गडचिरोली : एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले तेव्हापासून राज्यातील सरकार किती काळ टिकणार याविषयी बोललं जात आहे. तसेच या सगळ्याचा निकाल हे सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. परंतू सत्ताधारी आमदार यांच्याकडून निकाल चार ते पाच वर्षे लागणार नाही, असं म्हटलं जात आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
जयंत पाटील यांची टीका-
बंडखोर आमदारांकडून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चार ते पाच वर्षे लागणार नाही असा दावा केला जाणे हे धक्कादायक असून, हे लोक आता न्यायालयालाही गृहीत धरत आहेत, असं म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांच्या दाव्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. पण त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. इतकेच नाही तर त्याठिकाणी महापुरामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. नागरिक रस्त्यावर आले. अशा परिस्थितीत शिंदेंनी आधी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्याला तरी तत्काळ मदत करायला हवी होती. परंतू त्यांना नव्या सरकारची जुळवाजुळव करण्यापासून वेळ मिळत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली-
तसेच, जाहीर झालेली मदत केवळ कागदावरच आहे. राज्यपाल असो की लोकप्रतिनिधी यांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. स्थानिकांचा विरोध असताना देखील महाराष्ट्राच्या सीमेवर मेडीगड्डासारखे धरण उभारण्यात आले. तत्कालीन भाजप सरकारने त्याला बिनशर्त परवानगी दिली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप देखील पाटलांनी केला असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
