पुणे – आजपासून नवरात्री महोत्सव सुरु होत आहे. त्यात आता मुख्यमंत्री ठाकरेंनी मंदिरेही उघडली आहेत. त्यामुळे राज्यभरात आज उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील नेते मंडळींनी विविध धार्मिक स्थळांवर हजेरी लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतील मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
जयंत पाटील यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे भेट दिली यावेळी ट्रस्टतर्फे सत्कार देखील करण्यात आलायावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आज सरकारच्यावतीने मंदिरे उघडण्यात आली आहे. त्याच पद्धतीने घटस्थापनेच दिवस देखील आहे. राज्यातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे उघडण्याचा जी निर्णय सरकार ने घेतला आहे तो निर्णय स्वागतार्ह आहे.
आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक, आणि आत्ता दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे. राज्यात भविष्यात कोरोना वाढू नये, आणि हे राज्य सुखी राहावं माझी बाप्पा चरणी प्रार्थना आहे. असं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. मंदिरे उघडण्याच्या या निर्णयाच स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज राज्यभर करत आहेत.म्हणून आम्ही राज्यातील विविध मंदिरात जाऊन स्वागत उत्सव करत आहोत असं देखील यावेळी पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- नट्टू काका आणि अरविंद त्रिवेदी यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

