Share

Jayant Patil | “…त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार”; जयंत पाटील यांचं मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | शिर्डी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते सतत शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, टीका करत आहेत. तर हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचंही बोललं जात आहे. अशातच याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील (Jayant Patil)

आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. हे शिबीर सुरू होण्याआधीच जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमचं अधिवेशन झाल्यानंतर, राज्यातील सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच, आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला आहे.

दरम्यान, शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात या शिबिरात विचारमंथन होणार असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!