टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो, परंतु असा पराभव सरसकट सर्वच बुथवर कसा होऊ शकतो? हे सगळे धक्कादायक असून आम्ही याचा अभ्यास करतोय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी मतदारसंघात मी गेलो त्यावेळी पक्षाच्या बाजूने वातावरण अनुकूल होते. आम्हाला ९ ते १२ जागा मिळेल अशी आशा होती. मात्र पराभव हा पराभवच असतो. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असेही पाटील म्हणाले.
हातकणंगले मतदारसंघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही पराभव धक्कादायक आहे. राजू शेट्टी यांच्या सभांना मिळणाऱ्या गर्दीचा विरोधकांनी धसका घेतला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच निवडणुकीबाबत प्रश्न पडला आहे असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनता लोकसभेला दिलेला कल विधानसभेला राज्यात देईल असं वाटत नाही असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी यांनी व्यक्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
