🕒 1 min read
तुळजापूर – तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना रोखण्यासाठी नगरपरिषद ने बुधवार दि 22 ते 26 या कालावधीत पुकारलेल्या जनता कर्फ्युचा पहिल्या दिवसास नागरिकांनी घरातच थांबुन स्वयंस्फुर्तने प्रतिसाद दिला.
तिर्थक्षेञ तुळजापूर आज शंभर टक्के बंद होते ऐरव्ही गर्दी ने गजबजुन जाणारा मंगळवार पेठ जुने बसस्थानक चौक येथे शुकशुकाट होता तसेच बँकान मुळे सर्वाधिक गर्दी होणाऱ्या नळदुर्ग रस्त्यावर बँकानी जनता कर्फ्यु त सहभागनोंदवल्याने येथेही शुकशुकाट जाणवत होता.
सकाळी सहा ते नऊ कालावधीत पेपर वितरण करणारे दुध वितरण करणाऱ्या मंडळी व्यतिरिक्त कुणाही रस्त्यावर दिसुन आले नाही नउ नंतर माञ मुख्य रस्ते गल्लीबोळांन मध्ये शुकशुकाट दिसुन आला आज फिरायला येणारे मंडळी ही फिरण्यास बाहेर पडले नाहीत.
शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे मेडीकल दुकाने वगळता ऐक ही दुकान आज उघडले नव्हते. आज शहरातील ऐकृही नागरिक घराबाहेर पडला नाही व तालुक्यातुन ऐक व्यक्ती तुळजापूरात न आल्याने शहरभर सर्वञ शुकशुकाट जाणवत होता .
जनता कर्फ्यु पार्श्वभूमीवर शाषाकिय कार्यालय सुरु होते माञ कामासाठी ऐकही व्यक्ती न आल्याने कार्यालयात ही शुकशुकाट दिसुन आला. आज शहरातील पंधरा बँका व भाजीपाला विक्री दुकाने कृषी दुकाने पेट्रोल पंप ही पुर्णपणे बंद होते.
बाहेर गावाहुन आलेले रुग्ण व पोलिसांना माञ आज गैरसोयीस सामोरे जावे लागले.सामाजिक कार्यकते आनंद कंदले यांनी जनता कर्फ्यु पार्श्वभूमीवर शहरातील पन्नास रुग्णांना मोफत सेवा दिली.
महत्वाच्या बातम्या-
…मग या दांभिक भाजपा नेत्यांना पोटशूळ का व्हावा ? कॉंग्रेस नेत्याची जहरी टीका
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला
IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?
शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
