Share

जम्मूत कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी घडली एक धक्कादायक घटना

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आता पर्यंत कित्येक नागरिक प्राणास मुकले आहे. दरम्यान, या विषाणूच्या दहशतीमुळे अनेक अनुचित प्रकार घडत असल्याचे देखील समोर येत आहेत. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

जम्मू येथे व्यक्तीचा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना जमावाने अचानक हल्ला चढवला. यामुळे नातेवाईकांना मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून पळावे लागल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

डोडा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 72 वर्षीय जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी जम्मू येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर डोमना येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्नीदाह संस्कार सुरु होते.

‘या’ कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी,केजारीवालांचे उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट

यावेळी मृतकाची पत्नी, दोन्ही मुले आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या दरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक लोक जमा झाले आणि अंत्यसंस्कारात विघ्न आणले. जमावाने हल्ला करत दगडफेक केली आणि लाठ्या-काठ्याने हल्ला चढवला. त्यामुळे नातेवाईकांनी अर्धवट जळालेला मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि तेथून पळ काढला. यानंतर त्यांच्यावर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत व्यक्तीच्या मुलाने उपस्थित सुरक्षा रक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप केला. रुग्णवाहिकेचा चालक आणि रुग्णालय कर्मचारी यांनी आम्हाला सहकार्य केले, मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चांगली व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मृतकाच्या मुलाने म्हटले.या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मिडीयावर पडताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकित झाले शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दोन निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!