जालना : लोक कुठे काय करतील याचा नेम नाही. तालुक्यातील पारडगाव शिवारातील एका उसाच्या शेतात मागील काही दिवसांपासून गांजाची शेती चालू असल्याचे कळल्यावर पोलिसांनी छापा टाकून चार लाख ३० हजार रुपये किमतीचा ४३ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी शेत मालकाविरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारडगाव-परतूर रोडवरील गट क्रमांक २५० मधील एका शेतात सोमनाथ प्रभाकर चोरमारे या शेतकऱ्याने उसात गांजाची झाडे लावल्याची माहिती घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना शनिवारी मिळाली होती. या ठिकाणी उसाच्या शेतात गांजाची लहान व मोठी मिळवून ७४ झाडे आढळून आली. पथकाने ही झाडे उपटून त्याचे वजन केले असता ते ४३ किलो भरले. बाजारात या गांजाची किंमत चार लाख ३० हजार रुपये आहे. शेतकरी चोरमारे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे शेत आपण बटाईने केले असून, मूळ मालक जयश्री भगवान मापारे हे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून सोमनाथ चोरमारे यांच्यास शेत मालकाविरुध्द अमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस आणखीन तपास करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शेती करण्यासाठी त्या शेतकऱ्याला कोणी प्रोत्साहित केले, याचा शोध लागणे ही महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढले असते’
- राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट ; अक्षय पाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण
- ‘भगीरथच’ पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार – जयंत पाटील
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- ‘राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह,वीज तोडणी थांबवा आणि गरीब,मध्यम वर्गाला मदत करा’

