तुळजापूर-जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.
दरम्यान,काल जगद्जननी व महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारातील मृत्तिका, कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थातील तीर्थ अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या मंदिर निर्माण कार्यास विश्व हिंदू परिषद धाराशिव मार्फत तुळजाभवानी महाद्वार व आई जगदंबेने श्रीरामप्रभुना जिथे वरदान दिले त्या घाटशीळ व रामवरदायिनी येथे पूजन करून पाठवण्यात आली.
यावेळी या मृत्तिकेचे व तीर्थाचे पूजन महंत मावजीनाथ बाबा व महंत व्यंकट अरण्यगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. देशभरातून अनेक तिर्थक्षेत्रातून मृत्तिका व तीर्थ राम जन्मभूमी येथे सुरू होत असलेल्या मंदिर निर्माण कार्यात पाठवले जात आहे त्याचाच भाग म्हणून आज हे तीर्थ व मृत्तिका विश्व हिंदू परिषद धारशिवच्या वतीने अयोध्येस पाठवले जात आहे.
या पूजनाच्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, विंहिंप बजरंग दलाचे धाराशिव जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके, विंहिंप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चौरे, जिल्हा सहमंत्री परमेश्वर शिंदे, हभप बाबुराव महाराज पुजारी, तुळजापूर प्रखंड अध्यक्ष प्रा. काकासाहेब शिंदे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अर्जुनअप्पा साळुंके, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सौ. प्रभावती मार्डीकर, तुळजापूर दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका कु. श्रध्दा ठाकूर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक : गर्भात असतानाच बाळाला कोरोनोचा संसर्ग;ससून रुग्णालयात घडली दुर्मिळ घटना
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी; आरटीई कायदा आता १२वी पर्यंत लागू होणार
पक्षश्रेष्ठींची माफी मागा आणि पुन्हा पक्षात या; गेहलोत यांची पायलट समर्थक आमदारांना ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

