Share

Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवणार असल्याच्या बातम्यांवर जॅकलिनची प्रतिक्रिया, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ईडी जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्याच्या तयारीत आहे. याप्रकरणी जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील यांनी निवेदन जारी करून खुलासा केला आहे कि, ईडीकडून आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर आरोपी बनवल्याची बातमी समोर आल्यानंतर जॅकलिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

वकील काय म्हणाले?

जॅकलिनच्या वकिलांने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, “सध्या आम्हाला फक्त एवढेच कळले आहे की ईडीने तक्रार दाखल केली आहे. मात्र, ही माहिती केवळ मीडिया रिपोर्ट्सवरूनच मिळाली आहे. अद्याप ईडीकडून अधिकृत नोटीस आलेली नाही. माझ्या क्लायंटला तक्रारीची प्रतही मिळालेली नाही. पण जर मीडियाचे वृत्त खरे असेल तर जॅकलिनला या प्रकरणात जाणूनबुजून आरोपी बनवले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या क्लायंटची फसवणूक झाली आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखरने त्यांनाही फसवलं आहे. तरीही आरोपपत्रात जॅकलिनचे नाव येणे हे मोठे षडयंत्र आहे.

काय म्हणाली जॅकलिन?

जॅकलिनला आरोपी बनवणार असल्याची शक्यता समोर आल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात तिने लिहले आहे कि, “प्रिय मी, मी सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. मी शक्तिशाली आहे आणि स्वतःला स्वीकारले आहे. एक दिवस सर्वकाही ठीक होईल. मी मजबूत आहे. मी माझी ध्येय आणि स्वप्न साध्य करेन, होय मी हे करू शकते.”

जॅकलिनला होऊ शकते अटक

या प्रकरणात ईडीने अद्याप न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे जॅकलिनला सध्या तरी अटक होऊ शकत नाही. पण न्यायालयीन सुनावणीनंतर मात्र अटक होऊ शकते. तसेच सध्या जॅकलिन फर्नांडिसला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाहीये.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!