Share

Balasaheb Thorat | ‘सागर’ बंगल्यात वॉशिंग मशीनचं काम चालतं…; रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीनंतर थोरातांची टीका

Published On: 

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘सागर’ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणात दोषी आढळल्या आहेत. मात्र हा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. शुक्ला यांची नियुक्ती सध्या हैद्राबादमध्ये करण्यात आली आहे. तरी देखील शुक्ल या फडणवीसांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तर यावरूनच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “सागर बंगल्यात कदाचित वॉशिंग मशीनचं काम चालत असेल, म्हणून शुक्लांनी फडणवीसांची भेट घेतली असावी. येत्या काळात अजून बरंच काही घडणार आहे. पण आमचे लोक त्यांना प्रत्युत्तर देतील.” दरम्यान 2019 विधानसभा निवडणुकीत आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी सत्ताधारी नेत्यांचे फोन टॅप केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केला. नेत्यांच्या फोन नंबरचा उल्लेख खोट्या नावांनी केला. तसेच हे सगळं भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं असल्याचंही बोललं जातं. तर हा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्ला फडणवीसांना भेटल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंबोजही सागर बंगल्यावर

तर रश्मी शुक्ला या फडणवीसांची भेट घेऊन निघाल्यावर पुढच्या १० मिनिटात तेथे भाजप नेते मोहित कंबोज देखील सागर बंगल्यावर दाखल झाले. ते तिथे कशासाठी गेले होते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काल मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात भाजप एखादी नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे, त्यामुळेच कंबोज आणि फडणवीसांची भेट झाली असेल, अशा चर्चा आहेत. कंबोज यांच्या ट्विटनुसार राज्यातील एक मोठा नेता अडचणीत येणार आहे, पण त्यांचा रोख नक्की कुणाकडे होता हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!