टीम महाराष्ट्र देशा : “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे”. असे ट्विट करत खासदार उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबदमधील घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.
तसेच महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचं म्हटलं आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून वर्ध्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे. ५० वर्षीय पीडित महिला ही गंभीररित्या भाजली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

