नवी दिल्ली : कोविड-19 नंतर आत्ता ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारामुळे BCCI ने दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलला आहे. पण तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) जाणार आहे. आता पहिला 17 ऐवजी 26 डिसेंबरला होणार आहे. बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते.
निवड समिती मुंबई कसोटीनंतर दक्षिण आफ्रिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. मात्र बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रहाणेला केवळ भारतीय उपकर्णधारपदावरून हटवले जाऊ शकत नाही, तर तो दौऱ्यावरही जाणार नाही, अशीही शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून रहाणेची कसोटीतील कामगिरी निराशाजनक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही रहाणेची कामगिरी चांगली नव्हती. दुसऱ्या कसोटीत त्याला दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्याची जागा विराट कोहलीने घेतली.
दुसरीकडे, रहाणेच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत निवड समिती आणि बीसीसीआयकडून खात्री नाही. या दौऱ्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी भारतीय संघ निवडला जाऊ शकतो. यानंतर रहाणेचे कसोटी उपकर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनिनुसार, ‘ही कठीण परिस्थिती होती. तो संघर्ष करत आहे पण त्याला संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. त्याची कारकीर्द अप्रतिम झाली आहे. त्याची निवड पूर्णपणे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा कसोटीत उपकर्णधार म्हणून दिसणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘रहाणेने एक पाऊल मागे घ्यावे आणि आपल्या फलंदाजीत काही सुधारणा करावी. आम्ही त्याच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकू इच्छित नाही. रोहित आधीच नेतृत्व गटात असल्याने कसोटीत उपकर्णधारपद त्याच्याकडे देणे योग्य ठरेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी महत्त्वाचे निर्णय :
१. बीसीसीआय अंतिम कार्यक्रमावर CSA च्या प्रतिसादाची वाट पाहत आहे आणि संघातील खेळाडूंच्या संख्येवर निर्णय घेईल.
२.नेट बॉलर्ससह 25 खेळाडूंचा मोठा संघ पाठवण्याची अपेक्षा आहे. भारत अ दौऱ्यातून काहीजण संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
३. मुंबई कसोटीनंतर होणाऱ्या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड केली जाणार आहे.
४. या बैठकीत रहाणेचा संघात समावेश करण्याबाबत चर्चा होणार आहे.
५. राहुल द्रविडच्या विनंतीनंतर मुंबईत आठवडाभर शिबिर होणार आहे.
६. रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर शिबिरात सामील होतील.
७. 16 डिसेंबरला संघ रवाना होण्याची शक्यता आहे. CSA च्या पुष्टीनंतर क्वारंटाइन आणि ठिकाण बदलण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
महत्वाच्या बातम्या
- कारण नसतांना विरोध करणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट; भुजबळांचा फडणवीसांना टोला
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- ‘भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या लेखण्या म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या शेपटा’
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

