Share

औरंगाबाद विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी- धनंजय मुंडे

Published On: 

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राजकीय दबवातून आपल्या पदाचा गैरवापर करीत असून त्यांनी पात्रता न पाहताच अभ्यासमंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अभ्यासमंडळावर झालेल्या नियुक्त्या या बेकायदेशीर असून त्या नियुक्त्या रद्द करुन ही नियुक्त्यांची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी ना.धनंजय मुंडे व आ.सतीश चव्हाण यांनी राज्यपालांकडे केली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणूका नुकत्याचा पार पडल्या. मात्र या निवडणूकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे व अधिष्ठाता यांनी नवीन विद्यापीठ कायदा धाब्यावर बसवत अभ्यासमंडळाच्या नियुक्तीसाठी विद्यापीठाने सूचना अथवा परिपत्रक न काढता नियुक्तया केल्या असल्याचे ना.धनंजय मुंडे यांनी सी.विद्यासागर राव यांना सांगितले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी झालेल्या अनियमीत नियुक्त्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन राज्यपालांनी विरोधी पक्षेनेते ना.धनंजय मुंडे, आ.सतीश चव्हाण, जेष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांना दिले.

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सदरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांबाबत समिती गठीत करून याची चौकशी करण्यात येईल व यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ना.धनंजय मुंडे, आ.सतीश चव्हाण, जेष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांना दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!