औरंगाबाद :सध्याच्या काळात धर्म बदलणे खूप सोपे आहे. पण पिकपद्धती बदलणे कठिण असल्याचे मत कृषीरत्न विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले. जल आणि मृदासंधारण क्षेत्रात भरीव योगदान देणारे कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि जगप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांना सोमवारी एमजीएम महात्मा गांधी मराठवाडा भूषणने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये असे या सन्मानाचे स्वरुप होते. अत्यंत कृतीशील आणि वास्तववादी व्यक्तींचा एमजीएमकडून गौरव होत असल्याची भावना समाजसेवक आणि पर्यावरणवादी गिरीश गांधी यांनी या वेळी व्यक्त केली.
महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर कला, क्रीडा, राजकारण, साहित्य आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्यास उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर विजयअण्णा म्हणाले, एमजीएमचा महात्मा गांधी मराठवाडा भूषण मला कुटुंबानेच दिलेला पुरस्कार वाटतो. यात थोडी अवघडल्यासारखी भावना असली तरी आनंद आहे.
बॅरिस्टर गांधी, अप्पासाहेब पवार, अण्णासाहेब शिंदे, मनीभाई देसाई यांच्यामुळे प्रेरणा घेऊन मी मृदासंधारणाचे काम करतो. मातीचे काम करताना पाणी आपोआप मिळते, असे माझे ठाम मत आहे. मातीचे संवर्धन केले तरच पाण्याचे संवर्धन होईल. सध्याच्या काळात धर्म बदलणे खूप सोपे आहे पण पिकपद्धती बदलणे कठिण आहे. त्यामुळे बदलत्या हवामानावर काम होताना त्यास पुरक पिक घेणे महत्वाचे आहे. तर, चित्रकार मुरली लाहोटी म्हणाले, चित्रकाराने काय बोलावे, हे आठवत नाही. मी रंगातून आकार निर्माण करतो. त्यासाठी स्थळ, काळ माझ्यासाठी महत्वाचे ठरत नाही तर माझ्या कलेप्रती असलेली माझी निष्ठा महत्वाची ठरते. असेही ते म्हणाले.
पुरस्काराची रक्कम शंकरबाबा पापळकरांच्या कार्यास समर्पित
एमजीएम महात्मा गांधी मराठवाडा भूषणासोबत मिळालेला ५० हजार रुपयांचा धनादेश विजयअण्णा बोराडे यांनी अनाथ आणि दिव्यांगांसाठी कार्य करणारे शंकरबाबा पापळकर यांच्या कार्यासाठी देण्याची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
