Share

 धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही – नवाब मलिक 

Published On: 

मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे त्यावर जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहित आहे असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले शिवाय राज्यपाल व त्यांचे नेते असतील लोकांची दिशाभूल कशी करत आहेत हे उघडपणे लोकांसमोर मांडले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!