Share

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी साताऱ्यात पाहायला मिळाली मोठी गर्दी

Published On: 

सातारा: गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. या कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सातारा जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी सर्वत्र मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली. सातारा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारात किराणा सामान व जीवनावश्यक गर्दी केली. किराणा मालाची दुकाने, होलसेल व्यापारी, डी मार्ट आदी ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळाली. सातारा शहरात बाजारपेठेच्या भागात व मुख्य रस्त्यावर लोक उतरले होते. वाई शहरात संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित असल्याने, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा येथे जनता बंद मुळे आधीपासून बाजारपेठ बंद आहे. यामुळे सुरुर महाबळेश्वर रस्त्यावरील डी-मार्ट व अपना बझार मध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा शहरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

दरम्यान, जूनमध्ये दिलेल्या शिथिलतेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतल्याने पुन्हा जिल्ह्यात शुक्रवार (दि. १७) पासून कडक टाळेबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरवातीला सातारा जिल्ह्यात अजिबात रुग्ण नव्हते. परदेशी नागरीकांमुळे व नंतर मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून विना परवाना येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आले. आता स्थानिकांनी घेतलेल्या शिथिलतेचा गैरफायद्यामुळे गेल्या काही दिवसांत बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे टाळेबंदीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद, प्रवाशांचे हाल

…म्हणून तडकाफडकी ‘डॉक्टर डॉन’ मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!