Share

आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न – शिवेंद्रराजे भोसले

Published On: 

सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे आज उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रखडलेल्या मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा घणाघाती आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. तर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आरक्षणासाठी लढणं गरजेचं असल्याच मत देखील यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलून दाखवले.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!