औरंगाबाद: मेकोरॉट ही इस्राइलची शासकीय कंपनी मराठवड्यातील पाण्याचा तालुकानिहाय अभ्यास करणार आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
पाण्याशी संबंधित औरंगाबाद विभागातील आवश्यक असणारी सर्व माहिती यंत्रणेकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे इस्राइलच्या सदस्यांना डॉ. भापकर यांनी सांगितले. यामध्ये मराठवाड्यात गेल्या २० ते २५ वर्षात झालेला पाऊस, साठवलेले पाणी, पिण्याच्या पाण्याची स्थिती, शेतीची स्थिती, धरणांची साठवण क्षमता, धरणांची अवस्था तसेच मराठवाड्यातील एकुणच पाणी आणि वातावरणासंदर्भातील माहितीचा यामध्ये समावेश राहणार आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ही माहिती मेकोरॉट या शासकीय कंपनीला देण्यात येणार आहे. या बैठकीत डिएगो बर्गर व इयरोन गेलर यांनी इस्राइलने पाणी वापराबाबत सुचविलेल्या उपायांवर आधारित असलेल्या सेठ सिएगल लिखित ‘लेट दिअर बी वॉटर’ या पुस्तकाची प्रत डॉ. भापकर यांना यावेळी दिली.
मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत डिएगो बर्गर आणि इयरोन गेलर यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राइलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने,साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

