Share

इशान किशनची गुरुदक्षिणा! सामनावीराचा पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांना केला समर्पीत

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला. या सामन्यातील सामनावीर इशान किशनचे सगळीकडे कौतुक होत आहे. किशनच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवीण्यात आले. सामन्यानंतर बोलताना हा सामनावीर पुरस्कार मी माझ्या प्रशिक्षकांच्या दिवंगत वडीलांना समर्पीत करतो असे म्हणाला.

सामन्यानंतर इशान म्हणाला,”काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले. आजची खेळी मी त्यांना समर्पित करतो. माझ्या प्रशिक्षकांनी त्यांच्या वडिलांसाठी किमान अर्धशतक झळकाव, असे सांगितले होते. त्यामुळेच हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो.’ यावेळी सामन्यापुर्वी रोहित शर्माने आयपीएलमध्ये खेळतोस, तसाच खेळ आणि मनात कोणताही गोंधळ ठेऊ नकोस असा सल्ला दिला होता.

टी-२० पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी अजिंक्य रहाणेनं पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. तसेच पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा इशान किशन हा चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मोहित शर्मा , पृथ्वी शॉ, नवदीप सैनी यांनी पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!