पुणे : राज्यात जनता कोरोनाचा संकटात असताना विद्युत मंडळाचा महावितरण कंपनीने घरगुती विजेची बिले अवाजवी पाठवून लोकांच्या जखमीवर मिठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. खर तर लॉक डावून काळात संपूर्ण विजबिल सरकारने माफ करायला हवी. शिवसेना नेते खा . संजय राऊत सामनातून केंद्र सरकारचा इंधन वाढीवर लिहतात , मग विजेच्या अवाजवी बिलावर का लिहत नाही ? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे . सामनाची भुमीका म्हणजे आपल ठेवायच झाकून , दुसऱ्याच बघायच वाकून असल्याची टिका त्यांनी केली आहे.
भुजबळांच्या ‘या’ मागणीला दानवेंच्या खात्याने दिली झटपट परवानगी
यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे. की देशात कोरोना संकट सुरू झाल्यापासून लॉक डाऊन आहे. प्रत्येक माणूस घरात बसून आहे. व्यापार उद्योग धंदे , कुठल्याही प्रकारे सुरू नाहीत. विज वापर 100% बंदच आहे . एसी , फ्रीज, वापरू नका, अशा प्रकारचे आव्हान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुरुवातीला केल्याने जवळपास दोन महिने घरगुती वीज वापरात लोकांनी एसी पण लावले नाही .
घरात विज वापर नेहमी पेक्षा कमीच झाला . सध्या जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे. एका घासाची चिंता जनते समोर आहे. अशा परस्थीतीत खरंतर राज्य सरकारने , घरगुती बिले माफ करायला पाहिजे होती मात्र चोराच्या उलट्या बोंबा या म्हणी प्रमाणे वीज बिले माफ करणे बाजूला राहिले. त्यापेक्षा अधिक महावितरण कंपनीच्या लोकांनी. मीटर रेडींग प्रत्यक्ष न घेता अंदाजे अवाजवी बिले दिली .
आज ज्या ग्राहकांना प्रतिमहिना एक हजार रुपये बिल येतं त्यांना सहा हजार ते सात हजारापर्यंत बिल अकारणी झाली . राज्यात बहुतांश ठिकाणी अशाप्रकारे वाजवी बिल आल्याच्या तक्रारी. ग्राहकांनी केल्या असून फार मोठा संताप महावितरण कंपनीच्या विरोधात व्यक्त होत आहे. ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत यांनी बिले भरताना टप्पे पाडून देऊ असं, म्हटलं असलं तरी. जास्त बिल वाढून देणे याला जबाबदार कोण?
असा सवाल भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विचारला आहे.
‘अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’
दुसरीकडे शिवसेना नेते ते खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी सामना’च्या माध्यमातून आजच इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र त्यांची ही भूमिका म्हणजे आपलं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून,? अशाप्रकारचा आहे .असं वाटलं होतं, विजेच्या वाजवी बिलाबाबत सामनामधून काही टीका ? राज्य सरकार व ऊर्जा खात्यावर होईल. मात्र राजकारण किती ती सामान्य जनतेच्या प्रश्नाला वेठीस धरणार , असत . असा हा प्रकार आहे, सामना ने ऊर्जा खात्याला जनहितासाठी चांगला शॉक दिला असता तर, लोकांनी त्याचं स्वागत केलं असतं मात्र हे न घडे कधी असं कुलकर्णी यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे .
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
