Share

‘अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

इंधन दरवाढ : आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; आव्हाडांची अक्षयवर टीका

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी देखील पडळकर यांच्यावर शरसंधान केले आहे. ‘अरे गोपी तुझ्यात हिम्मत असेल तर तू फक्त फोन घे’ असे खुले आव्हान काकडे यांनी फेसबुक पोस्ट करून पडळकर यांना केलं आहे .

दरम्यान, काल देखील अंकुश काकडे यांनी भाजपवर आणि पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. पडळकरांचं वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? हे आधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं अन्यथा पडळकरांचे पुढचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा काकडे यांनी दिला होता.

मोदी-फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना राष्ट्रवादीवाल्यांना संस्कृती माहिती नव्हती का?

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवालही काकडेंनी उपस्थितीत केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!