Share

‘ड्रग्ज माफिया तुमचे घरजावई आहेत का?’, मलिकांच्या आरोपांवर राम कदम संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्यानंतर बॉलिवूडबरोबरच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी आज एनसीबीन ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आर्यन खान, आरबाज खान यांना पकडून एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे लोक भाजपशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मनीष भानुशाली व के. पी. गोसावी यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी केला. पैकी मनीष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असून त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून ते अनेकांसोबत फोटो आहेत. एनसीबीशी त्याचा दुरान्वयेही संबंध नाही. के. पी. गोसावी हा माणूसही फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी केला.

यानंतर भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या साहसाने क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज आणि काहींना रंगेहाथ पकडले. संपूर्ण देशात त्यांचे कौतुक सुरुये. पण दुसरीकडे सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही सर्व कारवाई ढोंग आहे असे सांगत अधिकाऱ्यांचा अपमान करत आहेत. राज्याचे मंत्री अप्रत्यक्षपणे ते ड्रग माफियांचे समर्थन करत आहेत का? कोट्यवधी रुपयांची वसुली त्यांच्याकडूनही केली जाते का? या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील असे राम कदम म्हणाले.

‘जे अधिकारी ड्रग्ज माफियांवर कारवाई करतात ते ढोंगी, पण ड्रग्ज माफिया चांगले. काय म्हणायच काय? ठाकरे सरकारची मती कुठे गेलीये? ड्रग माफिया या तीन पक्षांच्या सरकाराचे कोण लागतात? रिया चक्रवर्तीच्यावेळी सुद्धा तिच्या व्हॉट्स अॅप चॅटवरील ड्रग्जशी संबंधित संभाषण ६६ दिवस का लपवले? कोण लागतात हे ड्रग्ज माफीया? घरजावई आहेत का? असे अनेक प्रश्न कदम यांनी उपस्थित केलेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!