Share

आयपीएलमुळे इतर बोर्डाचे नुकसान होत आहे का?; दक्षिण आफ्रिका वादावरून माजी खेळाडूने केला सवाल

Published On: 

मुंबई: आयपीएलचा करार असलेल्या सर्व दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बांगलादेशविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका वगळण्याचा निर्णय घेतल्याने क्लब विरुद्ध देश वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कागिसो रबाडा, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन यासारखे खेळाडू बांगलादेशविरुद्ध चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी भारतात रवाना होतील, यामुळे पुन्हा मोठा वाद सुरु झाला आहे.

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने (akash chopra) दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा आणि आयपीएलचा बचाव करताना म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मार्केट अशा प्रकारे चालते. “हा सगळा प्रकार बघता उद्भवणारा प्रश्न असा आहे की, क्लब देशापेक्षा मोठा आहे का? क्लब विरुद्ध देश वादाने पुन्हा थोडा पेट घेतला आहे. प्रश्न असा आहे की आयपीएल (IPL) इतर बोर्डांचे नुकसान करत आहे का?” त्याने यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

चोप्रा पुढे म्हणाला की खेळाडूंना एक बाजू निवडण्यास भाग पाडले जाऊ नये कारण ते आंतरराष्ट्रीय कर्तव्यापेक्षा आधी आयपीएल निवडतील. “खेळाडूंना ही कठीण निवड करायला लावू नका. क्लब विरुद्ध देश संघर्ष सुरूच राहील, त्यावर वेगवेगळी मते असतील पण वस्तुस्थिती अशी आहे की खेळाडू द्विपक्षीय वचनबद्धतेच्या आधी आयपीएल निवडतील आणि बोर्ड ते थांबवू शकणार नाहीत.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!