Share

भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का ?

Published On: 

जालना – गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने भाजपवर याच मुद्द्यावरून टीका केली आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का? असा खरमरीत सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपने लोकांना फसवलं आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढलाय असंही त्यांनी म्हटलंय.

आज पटोले यांचा जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकांना खोटं बोलून भाजपने सत्ता मिळवली आणि महागाई वाढवली आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी ही काँग्रेसची जुनी मागणी असून मी विधानसभा अध्यक्ष असताना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधानसभेत पारीत केला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!