Share

आयपीएलच्या सामन्यांवर बंदी घाला; राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- ऐन उन्हाळ्यात आयपीएल सामन्यांदरम्यान होणारी पाण्याची नासाडी पाहता, अकराव्या हंगामातील सामन्यांवर बंदी घालण्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादापुढे दाखल करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हि याचिका मांडण्यात आल्या नंतर न्या. जावेद रहिम यांनी या याचिकेवर केंद्रीय जलसंधारण मंत्रालय, बीसीसीआय आणि तब्बल ९ राज्यांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.

राजस्थानच्या अलवर शहरात राहणाऱ्या हैदर अली या युवकाने हरित लवादापुढे ही याचिका दाखल केली आहे. हरित लवादाने सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिलेला असून या प्रकरणात पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे हरित लवादाच्या नोटीसीवर संबंधीत यंत्रणा आपली काय बाजू मांडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

हैदर अलीने आपल्या याचिकेत काय म्हटलं आहे?
मैदानांची निगा राखणे व अन्य खासगी गोष्टींसाठी आयपीएल सामन्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. देशातल्या अनेक भागांमध्ये अजुनही पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना ही नासाडी बरोबर नाही अशी भूमिका हैदर अली या युवकाने आपल्या याचिकेतून मांडली आहे. ७ एप्रिलपासून सुरु होणारे अकराव्या हंगामाचे आयपीएल सामने हे देशभरात ९ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ५१ दिवसांमध्ये तब्बल ६० सामने खेळवले जाणार असल्यामुळे, यातून होणाऱ्या नासाडीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात याचे वाईट परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील असंही हैदर अलीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!