मुंबई : आयपीएल २०२२(IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणारा भारतीय फलंदाज अंबाती रायडूने काही वेळापूर्वी हा त्याचा शेवटचा आयपीएल (IPL) हंगाम असेल, असे ट्वीट केले होते. रायडूने त्याच्या निवृत्तीबद्दल ट्विट करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. पण काही वेळातच रायडूने त्याची पोस्ट डिलीट केली. ज्यामुळे अंबाती रायडूच्या नेमकं काय विचार करतोय, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात उपस्थित झालाय.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “हा माझा शेवटचा आयपीएल (IPL 2022) हंगाम असेल, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आयपीएल (IPL) खेळताना आणि १३ वर्षांपासून २ महान संघांचा भाग असताना मला खूप आनंद झाला. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे मनापासून आभार मानायला आवडेल.”

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांच स्पष्टीकरण
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, अंबाती रायडू निवृत्त होत नाहीये. कदाचित तो त्याच्या कामगिरीवर खूश नसेल. ही फक्त एक मानसिक गोष्ट आहे. तो त्याचा आयपीएलचा प्रवास चेन्नईसोबत सुरू ठेवेल. सीएसकेच्या सीईओच्या या विधानामुळे हे स्पष्ट होते की रायुडू अद्याप निवृत्त होत नाही. परंतु त्याने ही पोस्ट का केली असावी? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय.
चेन्नईसाठी रायडूची कामगिरी
रायुडू २०१८पासून चेन्नई संघाच्या फलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने संघाला अनेक कठीण प्रसंगातून विजय मिळवून दिला आहे. रायुडूने आतापर्यंत चेन्नई संघाकडून ७३ आयपीएल सामने खेळले आहेत. यातील ६७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३२.७९च्या सरासरीने १७७१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकेही ठोकली आहेत.
मुंबईसाठी ७ वर्ष खेळला
यापूर्वी रायुडू २०१० ते २०१७ या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने यादरम्यान ११४ सामने खेळले. यातील १०७ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने २७.१४च्या सरासरीने २४१६ धावा चोपल्या. यामध्ये १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
रायडूची एकूण आयपीएल कारकीर्द
अंबाती रायुडूने आयपीएलमध्ये एकूण १८७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.२८च्या सरासरीने ४१८७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २२ अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०० ही आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

