Share

“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही”; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे. यानंतर केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिच्या अटकेची मागणी केली जात आहे. पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील केतकीवर हल्ला चढवला आहे.

“आमच्या भगिनी (केतकी) जे काही लिहले आहे, ते अत्यंत घाणेरडेपणाचे आहे. शरद पवार हे मनाने खुप मोठे आहेत आणि मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर आता ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे तशा पद्धतीने व्यक्त झालो नसतो. मी मर्यादा पाळतो मात्र कार्यकर्त्याचे तसे नसते. तुम्ही खालच्या पातळीवर टाका केली तर कार्यकर्त्याचे मस्तक भडकू शकते. कार्यकर्ता हा वेडा असतो त्याचे पवारांवर आई-बाबसारखे प्रेम असते. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. मी कोणाला पाय लावून देणार नाही आणि पाय लावला तर सहन करून देणार नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आम्ही राजकीय टीकेवर सडेतोड उत्तर देतो. अशा प्रकारच्या लढाईत मजा येते. ही एक वैचारिक लढाई आहे. पवार ब्राम्हणांच्या विरोधात वैगरे काही नाहीत. ब्राह्मणवाद हा मनुस्मृती मधून जन्माला आल्याचे आव्हाड म्हणाले.

केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट –

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक ll

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!