🕒 1 min read
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय, शिक्षण त्यासोबत क्रीडा क्षेत्रावर पण दिसून आला आहे. अनेक खेळांचे सामने हे कोरोनामुळे रद्द करावे लागले आहेत. आता मात्र लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा दुबईत होणार हे जवळपास निश्चीत झालं आहे.
शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक झाली, त्यात या निर्णयावर एकमत झाल्याचं कळतंय. आयसीसीने टी-२० विश्वचषक रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर, बीसीसीआय भारत सरकारकडे आयपीएल भारतात आयोजन करण्याबाबत परवानगी मागेल. पण देशातली परिस्थिती तोपर्यंत सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये हलवली जाईल. भारत सरकारकडून अधिकृत परवानगी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलबद्दल आपली घोषणा करणार असल्याचं कळतंय.
दरम्यान , बीसीसीआय खेळाडूंचं आरोग्य धोक्यात घालण्याच्या तयारीत नाही. म्हणून डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्याही पद्धतीच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. तसेच स्थानिक क्रिकेटसोबतच भारतात यंदा कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवलं जाणार नाही.
जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा स्टेडीयमवर यंदा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकही सामना भरवता आला नाही. पण वर्षाअखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी मोटेरा मैदानावर भारतीय खेळाडूंसाठी कँपचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. मोटेरा मैदानात खेळाडूंना राहण्याची व्यवस्था आहे. सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या मैदानात गरज पडल्यास खेळाडूंना क्वारंटाइन करण्याची सुविधाही आहे.
याव्यतिरीक्त राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने सीईओ पदासाठी जाहीरात देण्याचं ठरवलं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत होती.
क्रीडा विश्वात हळहळ : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
आनंदाची बातमी: भारतीय कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी साताऱ्यात पाहायला मिळाली मोठी गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
