दिल्ली: जगभरात कोरोनाचे १३ कोटींहून अधिक कोरोना बाधित रुग्ण झाले असून गेले ३ महिन्यांहून अधिक काळ झाला तरी संशोधकांना या रोगावर ठोस उपाय करणारी लस सापडलेली नाही. यातच जगभरात या लसीच्या शोधासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. आता यात भारतीय २ कंपन्या उरतल्या असून आत्मनिर्भर भारत साठी मोठं पाऊल असल्याचं या कंपन्यांचा सांगण आहे.
दरम्यान, २ लस संशोधकांनी विकसित केल्या आहेत. झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक अशा दोन कंपनींनी ह्या लसी शोधल्या असून आजपासून यांची मानवी चाचणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती खुद्द आयसीएमआर ने दिली आहे. तर हजारो स्वयंसेवक हे या चाचण्यांसाठी पुढे आले आहेत. दोन्ही लसींसाठी वेगवेगळ्या विभागातील १ हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे.
HSC: बारावी परीक्षा निकाल उद्या; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
चीनमध्ये ५, अमेरिकेमध्ये ३, भारत मध्ये २ तर रशिया,ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये प्रत्येकी १ लसीवर आता विविध चाचण्या सुरु आहेत. आता पर्यंत जगभरात या रोगाने ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रोगाच्या संकटातून मुक्त होब्यासाठी आता संशोधकांना लवकरात लवकर यश मिळो हीच भावना प्रत्येक जण व्यक्त करत आहे. जर भारताला हि लस बनविण्यात यश आले जागतिक महत्वकांक्षेला खूप मोठं यश मिळू शकत.
भारतात आज अखेर एकूण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ३६ हजार झाली असून आज २८ हजार ४९८ नव्या रुग्णांना लागण झाली आहे. तर आज ५५३ रुग्णांचा मृत्यू आज झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

